टी.एन.शेषन यांची सुरवातीची कारकीर्द :
देशाचे 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त जे त्या काळीच्या नेते मंडळीपेक्षा जास्त प्रसिद्ध झाले होते. त्यांचे नाव आहे टी.एन.सेशन जे 1990 ते 1995 दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांच्याबद्दल असे म्हणायचे की "नेता एक तर देवाला भितो किवा टी.एन.सेशन यांना भितो." यावरूनच ते किती कडक शिस्तीचे मुख्य निवडणूक अधिकारी होते याची जाणीव होते.
टी.एन.सेशन 1954 मध्ये UPSC ची परीक्षा पास होऊन तामिळनाडू येथे आयएएस (IAS) झाले. 1962 मध्ये त्यांना मद्रास ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा हेड बनवले. ह्या डिपार्टमेंट मध्ये असतानाचा एक किस्सा फार रोचक आहे. एकदा एका बस ड्रायव्हरने शेषन यांना म्हंटले "तुम्हाला ना बस चालवायला येते, ना त्याच्या इंजिन विषय काही माहीत आहे ना बस विषय काही माहीत नाही तर तुम्ही आमच्या समस्या कश्या जाणून घेणार?" ह्यानंतर शेषन यांनी स्वतः बस चालवायला शिकली, त्यांनी बस चे पूर्ण इंजिन खोलून जोडायला शिकले. एकदा तर त्यानी बस मधून ड्रायव्हरला खाली उतरून स्वतः 80 km बस चालवली होती. ह्यावरून त्यांच्या स्वभावाची जाणीव होते. पुढे ते हॉवर्ड मध्ये शिकायला गेले तिथे त्यांची दोस्ती सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी झाली. 1969 मध्ये भारतात परत आल्यानंतर atomic energy commission चे सचिव म्हणून नियुक्त केले. 1972 मध्ये ते डिपार्टमेंट ऑफ स्पेस (Department Of Space) मध्ये जॉइंट सेक्रेटरी झाले. पुढे राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पर्यावरण आणि वनमंत्रालय मध्ये सचिव पद मिळाले. त्यांच्या कार्यकाळात पर्यावरण आणि वनासंबंधी काही कठोर असे कायदे संमत झाले. तसेच त्यांनी जंगली जनावरांच्या शिकारीवर कठोर निर्बंध लावले.
टी. एन. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त व धडाडीचे निर्णय :
1989 मध्ये राजीव गांधी यांची सत्ता जाते व V.P. Singh यांची सत्ता येते. 1989 मध्ये त्यांना कॅबिनेट सेक्रेटरी केले जाते. 1990 मध्ये शेषन 10 वे मुख्य निवडणूक अधिकारी बनले. त्यांच्या नियुक्ती मध्ये चंद्रशेखर सरकार मधील वाणिज्य मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांचे मोठे योगदान होते. याविषयी एक मजेदार किस्सा आहे तो म्हणजे सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयुक्त होण्याचा प्रस्ताव जेव्हा शेषन यांना दिला तेव्हा ते राजीव गांधी याची भेट घेण्यासाठी गेले राजीव गांधींनी सहमंती दिली आणि जाता जाता म्हंटले की "त्या दाडीवल्या माणसाला परत पश्चात्ताप होईल की तुला मुख्य निवडणूक आयुक्त का केले?" दाढीवाला माणूस म्हणजे चंद्रशेखर. निवडणूक आयुक्त बनल्यानंतर त्यांच्याकडे विधानिक अधिकार आले. त्या वेळी असे म्हंटले जायचे की,
"नेते एक तर देवाला भितात किंवा शेषन यांना भितात."
बोगस मतदान थांबवण्यासाठी त्यांनी सरकारला प्रस्ताव दिला की मतदान कार्डवर त्या व्यकीचा फोटो लावला त्यावर सरकारने नकार दिला व कारण सांगितले की ह्या प्रक्रियेवर खूप खर्च होईल. शेषन देखील ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, ते म्हणाले जो पर्यंत फोटो लावला जात नाही तोवर कोणतीही निवडणूक होणार नाही. त्यानंतर 1993 मध्ये फोटो असलेलं मतदान कार्डची सुरवात झाली. 1995 मध्ये शेषन यांनी बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निवडणुका रद्द केल्या, त्यामुळे लालू प्रसाद यादव आणि शेषन यांच्यादरम्यान खूप खटके उडाले. लालू प्रसाद यादव यांनी घोषणा केली की,
"Seshan vs The Nation"
प्रणव मुखर्जीयांना शेषन याच्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
2 ऑगस्ट 1993 ला शेषन यांनी एक 17 पानाचा आदेश जारी केला होता. त्यामध्ये असे लिहिले होते की, सरकार जो पर्यंत निवडणूक आयोगाच्या शक्तिला मान्यता देत नाही तोपर्यंत देशात कोणतीही निवडणूक घेऊ नये. 2 वर्षांनी होणाऱ्या राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि पोट निवडणूका पुढील आदेशापर्यंत स्तागित करण्यात येत आहेत. हा झाला एक भाग आता आपण प्रणव मुखर्जींच्या मंत्रिपद कसे धोक्यात आले बागुयात. तर झाले असे की, 1991 च्या हर्षद मेहता घोटाळ्यामुळे पी. चिदंबरम यांना आपल्या वाणिज्य मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे 1993 मध्ये पी. चिदंबरम यांच्या जागी प्रणव मुखर्जी यांना वाणिज्य मंत्री केले पण ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्यातरी एका सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य होते. पण शेषन यांनी निवडणूक प्रक्रिया राबवणे थांबवले होते त्यामुळे अडचण निर्माण झाली होती. प्रणव मुखर्जी पश्चिम बंगाल मधून राज्यसभेवर जाणार होते पण निवडणूक प्रकिया थांबल्यामुळे सहा महिने होऊन गेले व प्रणव मुखर्जींना राजीनामा द्यावा लागला होता. ज्योती बसू देखील शेषन यांच्यावर चिडून त्यांना "पागल कुत्ता" म्हंटले होते.
काही जणांनी त्यांच्या विरोधात संसदेत महाभियोग सुरू करण्याची शिफारस केली पण प्रधानमंत्री नरसिम्मा राव यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यांना असे वाटत होते की जर असे काही केले तर जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी वाढेल. पण प्रधानमंत्री राव यांनी दुसरा मार्ग काढला व निवडणूक अधिकाऱ्यांची संख्या 1 वरून 3 अशी वाढवली व शेषन यांचे अधिकार काही प्रमाणात कमी केले. त्यांनतर शेषन सुप्रीम कोर्टात गेले पण तिथे सरकारचा निर्णय बरोबर असल्याचा निकाल मिळाला. शेषन वेळेच्या बाबतीत देखील खूप कठोर होते, जर बैठकीसाठी कोणी 1 मिनिट जरी उशिरा आले तर ते त्यांना बैठकीला बसू देत नसत. 1996 मध्ये त्यांचा निवडणुक आयुक्त म्हणून कार्यकाळ संपला. 1997 ला त्यांनी राष्ट्पतीपदासाठी निवडणूक लढवली पण त्यांना फक्त 5% मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. 1999 ला त्यांनी काँग्रेसकडून गांधीनगर येथून लाल कृष्ण अडवाणी यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण तिथे देखील त्यांचा पराभव झाला. ते म्हणत की
"I eat politicians in breakfast"
ह्यावरून ते किती धाडसी होते याचा अंदाज येतो. एक आदर्श निवडणूक आयुक्त म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते.
0 टिप्पण्या