Looking For Anything Specific?

Header Ads

पगार पुरत नव्हता म्हणून शास्त्रीजी वर्तमापत्रात लिखाण करत असत.

  "जय जवान जय किसान" हा नारा ऐकल्यावर कोणाची आठवण येते ? अर्थात लाल बहादूर शास्त्री यांची. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर त्यांनी देशाची धुरा अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळली. सुटाबुटातील अनेक पंतप्रधान आपण पाहिले पण शात्रीजी अत्यंत साधे होते ते नेहमी धोतर आणि कुर्ता घालत. ते अत्यंत नर्म, निष्ठावान आणि गांधी विचाराने प्रेरित होते.


पगार पुरत नव्हता म्हणून शास्त्रीजी वर्तमापत्रात लिखाण करत असत.



शास्त्रीजींचे प्रारंभिक जीवन :- 


लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1904 मध्ये उत्तर प्रदेशमधील मुग़लसराय येथे एका साधारण कुटुंबात झाला. विद्यार्थी दशेत असताना त्यांना स्वतंत्र लढा व क्रांतीकारी यांच्याविषय वाचनात आले. याचदरम्यान जलियानवाला बाग हत्याकांडानंतर विद्यार्थी आंदोलनाने गती पकडली होती. शास्त्रीजी त्या आंदोलनाचा हिस्सा होते. गांधीजींच्या नेतृत्वात असहकार आंदोलन सुरू होते त्यांनी देशवासीयांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी 16 वर्षाच्या लाल बहादूर शास्त्रीजीनी आपली शाळा सोडून या आंदोलनात सहभाग घेतला होता. 1921 मध्ये त्यांना तुरुंगात देखील जायला लागले होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी एकूण सात वर्ष कारावास भोगला होता. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरवात 1937 मधील उत्तर प्रदशमधील प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य होऊन केली. पुढे ते 1947 मध्ये उत्तर प्रदेशमधील मंत्रिमंडळात मंत्री झाले. तर 1951 मध्ये पार्टीचे महासचिव झाले. पुढे त्यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमडळात रेल्वे मंत्री मंत्री म्हणून लागली. पण 1955 मध्ये दक्षिण भारतात रेल्वे अपघात झाला व त्याची जबादारी घेऊन त्यांनी रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. 

1957 मध्ये ते पुन्हा अलाहाबादमधून खासदार झाले. 1961 मध्ये ते भारताचे गृहमंत्री झाले तसेच ते 'भ्रष्ट्राचार विरोधी समिती' चे सदस्य झाले. पुढे शास्त्रीजी भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय डेअरी विकास कार्यक्रम सुरू केला. तसेच 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतावर अन्न संकट आले असताना त्यांनी हरितक्रांतीसाठी प्रयत्न केले व यशस्वी केले. 1966 ला भारत-पाकिस्तान युद्धसमाप्ती करार तास्कंद येथे त्यांच्या कार्यकाळात झाला. 


शास्त्रीजीनचा साधेपणा व आर्थिक संघर्ष : 



एकदा माणूस किती साधा असावा तो ही भारताच्या पंतप्रधान पदावर असलेला माणूस याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. त्यांच्या या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले जातात. पंतप्रधान असताना त्यांनी कधीच सरकारी गाडीचा वापर केला नाही. त्यांच्या मुलाने एकदा सरकारी गाडीचा वापर केला होता, तेव्हा त्यांनी किलोमीटरच्या हिशोबाने सरकारकडे पैसे जमा केले होते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात सरकारने शास्त्रीजी यांच्या घरी कूलर बसवला होता पण नको त्या सवई लागतील म्हणून त्यांनी तो कूलर परत पाठवला. पंतप्रधान असताना देखील त्यांनी कधी आपल्या पत्नीला महागडी साडी दिली नव्हती. जेव्हा लाल बहादुर शास्त्रीजी खासदार होते तेव्हा त्यांना त्यांचे मानधन उदरनिर्वाहासाठी पुरत नसत, तेव्हा त्यांनी वृत्तपत्रात लिखाण करायला सुरवात केली होती. कुलदीप नायर हे शास्त्रीजी गृहमंत्री असताना त्याचे माहिती अधिकारी होते त्यांनी त्यांच्या 'beyond the line' या पुस्तकात याबद्दल लिखाण केले आहे. त्या काळी खासदारांना पगार देखील कमी असायचा. शास्त्रीजीना तुटपुंज्या पगारात घर चालवणे कठीण जायचे, त्या वेळी कुलदीप नायर यांनी त्यांना वृत्तपत्रात स्तंबलेखन करायचा सल्ला दिला त्यावर शास्त्रीजी देखील तयार झाले. ते द हिंदू , अमृतबजार पत्रिका, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रात लिखाण करत असत. त्यांना प्रत्येक लेखासाठी प्रत्येक वर्तमानपत्र महिन्याला पाचशे रुपये देत असत. यातून त्यांचा अतिरिक्त घर खर्च चालायचा. 1965 सालीची गोष्ट आहे एके दिवशी ते एका ठिकाणी कापड गिरणी पाहायला गेले होते. गिरणी पाहिल्यानंतर ते गिरणीच्या गोदामात गेले तिथे त्यांनी काही साड्या दाखवायला सांगितल्या. तिथल्या मालकांनी एका पेक्षा एक सुंदर साड्या त्यांना दाखवल्या, गिरणी मालकाने दोन साड्यांच्या किमती सांगितल्या एक आटशे रुपये आणि एक पाचशे रुपये त्यावर शास्त्रीजी म्हणाले ह्या खूपच महाग साड्या आहेत कमी किमतीच्या दाखवा तेंव्हा मालकाने एक पाचशे रुपयची आणि एक चारशे रुपायची साडी दाखवली, त्यावर शास्त्रीजी म्हणाले ह्या साड्यादेखील माझ्यासाठी खूप महाग आहेत. तेंव्हा गिरणी मालक म्हणाला आपण तर पंतप्रधान आहात ह्या तुमच्यासाठी महाग कश्या ? आम्ही तर ह्या साड्या तुम्हाला भेट देणार आहोत. तेंव्हा शास्त्रीजीनी नकार दिला होता. मी ह्या साड्या खरेदी करू शकत नाही त्यामुळे मी ह्या भेट सुध्धा घेऊ शकत नाही. आणखी एक सांगण्यासारखा किस्सा म्हणजे नाम म्हणजेच अलीप्तवादी चळवळ इजिप्त येथे होणार होता भारत नामचे नेतृत्त करत होता व शास्त्रीजी प्रधानमंत्री होते. या अधिवेशनाला शास्त्रीजी उपस्थितीत होते व त्यांची सोय "हिल्टन" या हॉटेल मध्ये केली होती. पण त्यांना बाहेरचे खाणे-पिणे पसंद नसत, म्हणून त्यांनी सोबत एक स्टोव्ह नेला होता. त्या स्टोव्हवर ते स्वतःचे जेवण बनवत होते. कुलदीप नायर त्या वेळी UNI चे रिपोर्टर म्हणून तो दौरा कव्हर करत होते. त्यांनी भारताचे पंतप्रधान स्वतःचे जेवण स्वतः बनवतो अशी बातमी प्रकाशित केली, पण त्याचा परिणाम उलटच झाला यामुळे हॉटेलच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला व त्यांनी हिल्टन हॉटेल व्यवस्थेने शास्त्रीजीना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला, पण इजिप्तच्या पंतप्रधान नासीर यांनी मध्यस्ती करून हे प्रकरण थांबवले होते. पुढे तास्कंदच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला व ते त्यांचे निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या