उद्योगपती फुले :
शेती हा जगातला सर्वात प्राचीन आणि मोठा व्यवसाय आहे, आजसुद्धा भारतातील निम्म्यापेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या काळात पूर्णपणे लोक शेतीवर अवलंबून होते. हा संदर्भ ह्यासाठी की फुले देखील मूलतः शेतकरी होते. ह्या शेतकऱ्याच्या मुलाने अनेक उद्योग, व्यापार ह्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली होती. त्यावेळी फुले यांची पूनां कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनी यांची वार्षिक उलाढाल ही टाटा यांच्यापेक्षा जास्त होती. 1869 साली टाटा यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 20000 रुपये होती, तर फुले यांच्या पूनां कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीची वार्षिक उलाढाल ही 21000 रुपये होती.
कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीच्या माध्यमातून केलीली कामे तसेच आयुक्त पदावर असताना केलेली कामे :
महात्मा जोतीराव फुले हे एक उद्योगपती देखील होते. तसेच ते पुणे शहराचे आयुक्त देखील होते. ते शेतकरी देखील होते त्यांची हडपसरला वडिलोपार्जित खूप मोठ्या प्रमाणात शेतजमीन होती, पुढे त्यांनी त्यामधे भर देखील घातली. त्यांचे असे मत होते की, फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीला काहीतर जोडधंदा असावा. हा आज लागू पडणारा विचार त्यांनी सुमारे दीडशे वर्षापूर्वी मांडला होता. त्यांनी "पूना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनी " स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनीं अनेक प्रमुख उद्योग केले. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम उद्योग सुरू केला होता. पुण्याहून सातारला जाताना जो कात्रजचा बोगदा लागतो तो महात्मा फुले यांच्या पुना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीच्या माध्यमातून बांधला गेला होता. तसेच पुणे शहराकडूंन नगरकडे किंवा औरंगाबादकडे जाताना जो बंड गार्डनचा पुल बांधला आहे तो देखील याच कंपनीने बांधला आहे. 1867 साली फिट झेराल्ड ब्रिज देखील पूना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीने बांधला होता. तसेच खडकवासला धरणाचा डावा कालवा याच कंपनीने बांधला आहे. अशी फार मोठी कामे त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून केलेली आहेत. ही कंपनी फक्त कॉन्ट्रॅक्ट घेत होती असे नाही, ह्या कंपनीच्या माध्यमातून जोतिबा फुले यांनी पुस्तके प्रकाशित करत होती. पुस्तकाच्या विक्रीची दुकाने चालवीत होती.
आपल्या देशातील महिलांना सोन्याची खूप आवड आहे असे म्हणतात. हे दागिने तयार करण्यासाठी जे सोन्याचे मोल्ड्स लागतात ह्या मोल्ड्सची संपूर्ण मुंबई प्रांताची होलसेल एजन्सी त्यांच्या पूना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीकडे होती. त्यावेळी मुंबई प्रांतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि सिंध हे भाग होते. या कंपनीच्या माध्यमातून आणखीन एक काम महात्मा जोतिबा फुले करत असे, ते म्हणजे पुण्याच्या हडपसर परिसरातून फळे, भाजीपाला रेल्वेने ते मुंबई येथील भाईखळा भाजी मार्केटला पाठवले जात असत. त्यामुळे पुढे भाईखळा मार्केटला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव देण्यात आले. या कंपीतर्फे करण्यात आलेले आणखीन एक काम म्हणजे, वेगवेगळ्या शिक्षण संस्था स्थापन करने, त्या संस्था चालवणे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवणे, वाचनालय स्थापन करने ही कामे ही संस्था करत असत. असे वेगवेगळे कामे करत असताना त्याच वेळी महात्मा जोतिबा फुले हे पुणे शहराचे आयुक्त आहेत. फुले यांनी हंटर कमीशन पुढे देखील 1882 साली साक्ष दिली होती. त्यांनीं सांगितले होते की, शिक्षण हे वरच्या वर्गातून खालच्या वर्गातील झिरपत जात नसून आपण सर्वप्रथम खालच्या वर्गात शिक्षण दिले पाहिजे. त्यांचे एक सहकारी तसेच पूना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीमधील भागीदार पोलास राजा लिंगू यांनी कॅम्प एज्युकेशन सोसायटीची स्थापना जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने 1885 साली सुरू केली होती. ही संस्था आज देखील कार्यरत आहे.
- हे पण वाच ना भाऊ
- तो निवडणूक आयुक्त ज्यांना प्रधानमंत्री देखील भीत असत !
- शरद पवारांनी स्वतःच्या भावाला हरवून राजकारणाची सुरवात केली होती.
- पगार पुरत नव्हता म्हणून शास्त्रीजी वर्तमापत्रात लिखाण करत असत
- जेंव्हा मिझोराम राज्याने स्वतःला आझाद देश म्हणून घोषीत केले.
महात्मा फुले यांचे आणखीन एक सहकारी व्यंकु कालेवार जे त्यांच्या पूना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीमध्ये भागीदार होते त्यांनी 1889 ते 1896 ह्या काळात मुंबई येथील महानगरपालिकेची ईमारत बांधली होती. रामय्या व्यंकय्या आय्यावरू यांनी देशातले सर्वात जुने भंडारदरा धरण हे पूना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीच्या माध्यमातून बांधले होते. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास नावाचा राजवाडा सुद्धा त्यांच्या कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीने बांधला होता. महात्मा फुले सात वर्ष पुणे आयुक्त पदावर होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मह्त्वपूर्ण कामे केली होती. त्यापैकी त्यांनी बंद नळाद्वारे पाणी पुणे शहरात आणून ते शुध्द करून नळाने देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते. त्या काळी अशुद्ध पाण्याची समस्या खूप मोठी होती. त्यांनी खडकवासला धरणातून शेताकडे पाणी नेण्यासाठी कॅनॉल देखील बांधले होते. त्यांनी पुणे शहरात प्रत्येक पेठेमध्ये किमान एक दवाखाना व किमान शाळा असली पाहिजे असा महत्वाचा निर्णय घेतला होता.
जोतिबा फुले आयुक्त असताना सरकारी अधिकारी असेल तरी ते सरकारचे मिंधे नव्हते. सरकारच्या काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्यांनी त्या ठामपणे सांगण्याचे काम करत असे. एकदा गव्हर्नर जनरल पुण्याला येणार होते, तेव्हा मुंबईच्या गव्हर्नरने असे कळवले की, त्यांच्या स्वागताला एक हजार रुपये खर्च करावेत. त्यावर फुल्यांनी नकार दिला होता व म्हंटले होते एक हजार रुपये उधळणे असे बरोबर नाही. अर्थात सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. दुसरा एक प्रसंग म्हणजे, पुण्यात सरकारने मंडई बांधायचे ठरवले होते, त्याला फुल्यांनी विरोध केला त्याचे म्हणणे होते की आजच्या परिस्थितीत आपल्याला याची गरज नाही, आपली गरज आहे शाळा बांधणे, दवाखाने बांधणे. त्या वेळीच्या परिस्थितीनुसार त्याचे म्हणणे बरोबरच होते. त्या मंडईला लोकमान्य टिळकांचा देखील विरोध होता, पण त्याच्या विरोधाचे कारण थोडे वेगळे होते. पुढे सरकारने याच ठिकाणी मंडई बांधली आणि काही वर्षांनी त्या मंडईला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव दिले व लोकमान्य टिळकांचा पुतळा ह्या मंडई मध्ये बांधला होता. फुले पुणे शहराचे आयुक्त असताना सात वर्षात त्यांनी पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, दवाखाने, शाळा अश्या गोष्टींना महात्मा फुले यांनी प्राधान्य दिले. त्यांनी शेअर मार्केटवर देखील कविता केल्या होत्या. त्यांनी कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तसेच बहुजन समाजातील मुलांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा. तो एक व्यापार आहे उद्योग आहे, पण गुंतवणूक करताना काळजी घ्या. ते कवितेमधून लिहतात,
" शेअर घेणाऱ्याच्या गळ्यात भालदोरी,
पावतीमध्ये आहे गड्या जडी-बुटी सारी."
आपण महात्मा जोतीराव फुले यांच्या शैक्षणिक कार्य तसेच कामगार चळवळीमध्ये योगदान याविषयी जाणून आहोतच पण या लेखामधून आपण ते उद्योगपती म्हणून कसे होते ? त्यांनी कोणती कामे केली? त्यांचा पुण्यातील आयुक्त पदाचा कार्यकाळ याविषय जाणून घेतली आहे.
0 टिप्पण्या