राजकारणाची सुरवात :
शरद पवार महाराष्ट्राच्या राजकाणातील मोठे नावं. गेले अनेक दशकं ह्याच नावाभोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत आले आहे. शरद पवारांनी आपल्या कारकीर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले अगदीच पुलोद पासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना असूदेल किवा सध्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित दादांनी पवारांची साथ सोडणे. ह्या प्रवासाची सुरवात झाली होती 1960 च्या दरम्यान ते पण स्वतःच्या भावाच्या विरोधात हो स्वतः च्या सर्वात मोठ्या भावाच्या विरोधात. पवारांनी स्वतःच्या भावाला हरवून आपल्या राजकारणाची सुरवात कशी केली होती ते आपण जाणून घेऊयात.
शरद पवारांना राजकारणाचे बाळकडू घेरातूनच मिळाले. त्यांची आई शारदा पवार ह्या पुणे जिल्हा लोकल बोर्डच्या सदस्य होत्या. 1938 साली 50 पैकी 36 जागा काँग्रेसने जिंकल्या त्यापैकी एकमेव स्त्री ह्या शारदाबाई होत्या. पुढे त्या शेकापच्या चळवळीशी जोडल्या गेल्या. पवार त्यांना बाई म्हणत. पवार तीन दिवसाचे असताना बाई त्याना लोकल बोर्डच्या मीटिंगला घेऊन गेल्या होत्या.
बंधूंच्या विरोधात लढाई :
असो मुद्द्याच बोलुयात, 1957 साली बारामती मधून केशवराव जेधे हे खासदार झाले होते. पण 1960 साली त्यांचे निधन झाले त्यामुळे ती जागा रिक्त झाली. त्याचदरम्यान 1960 च्या दशकात संयुक्तं महाराष्ट्र चळवळ शिघेला पोहचली होती. त्यात शेकाप संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाजूने होते. 1957 साली समितीने काँग्रेसला चांगलेच जेरीस आणले होते तसेच काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव सुद्धा झाला होता. अश्या परिस्थितीत बारामतीची पोटनिडणुक लागली. संयुक्तं महाराष्ट्र समितीकडून ऍडव्होकेट वसंतराव पवार म्हणजेच शरद पवार यांचे मोठे बंधू यांना उमेदवारी मिळाली. तर काँग्रेस कडून केशवराव जेधे यांचा मुलगा गुलाबराव जेधे यांना उमेदवारी मिळाली. पवारांच्या कुटुंबातील सारे सदस्य संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम करत होते. अश्यात कुटुंबाचे सारे लक्ष पवार साहेबांकडे होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ही निवडणूक स्वतः च्या प्रतिष्ठेची केली होती. इकडे S.M. जोशी, आचार्य अत्रे, उद्धवराव पाटील यांनी निवडणुकीच्या निमित्ताने रान पेटवायला सुरवात केली होती.
पवारांनी त्यांच्या बंधूंना स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे सांगितले की आपण काँग्रेसचे काम करणार आहे. त्यांनीही ही भूमिका सहजपणे आणि मोठ्या मनाने मान्य केली. खरे तर वसंतराव हे पवार कुटुंबातील पाहिले उच्च शिक्षित कायद्याचे पदवीदार व सर्व बंधूचे आधारस्तंभ. तसेच त्यांनी सर्व बंधुचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मेहनत केली होती. त्यामुळे पवारांवर त्यांच्याविरुद्ध कसे काम करायचे हे भावनीक दडपण होते. याउलट ते शरद पवारांना म्हणाले देखील,
" तुझी विचारधारा ही काँग्रेसची आहे तर तू त्याच पक्षाच आणि त्याचं पक्षाच्या उमेदवाराचे काम केले पाहिजेस."
त्यांच्या आईने देखील त्यांना बळ देले आणि म्हणाल्या
" तुझ्या विचारात स्पष्टता आहे, याचा मला आनंद आहे. आणि तू काँग्रेसचच काम केले पाहिजेस."
यामुळे त्यांना मनात कोणतीही घालमेल न होता निर्णय घेता आला . व पुढे त्यांच्या बंधूंचा पराभव देखील झाला. 1957 ला काँग्रेसची दमछाक झाल्याने ही निवडणूक काँग्रेस साठी महत्तावाची होती, त्यामुळे दिल्ली मधील काँग्रेस नेतृतवाचे देखील लक्ष ह्या निवडणुकीकडे होते.
पुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटिल यानी विचारांची स्पष्टता आणि काम करण्याची पद्धत यामुळे नवीन जबाबदारी देण्याचे ठरवले. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतूले हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते ते विधानसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांचे पद रिकामे होते. या पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. पक्षाकडून ही निवडणूक लढवण्याचे सुचवण्यात आले होते. पवारांनी ही निवडणूक लढवली आणि बॅरिस्टर राजाभाऊ भोसले यांचा पराभव करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
1967 साली त्यांना बारामती मधून विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली व पुढे ते आमदार देखील झाले. सुरवातीला त्यांचा उमेदवारीला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला पण यशवंतराव चव्हाण आणि विनायकराव पाटील यांच्या प्रयत्नाने उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधादरम्यान एक प्रसंग आवर्जुन सांगावासा वाटतो, तो म्हणजे विरोध करण्याऱ्या एका नेत्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक प्रश्न विचारला "महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे सत्तर जागांपैकी किती जागी काँग्रेस जिंकेल ?" त्यावर त्या नेत्याने उत्तर दिले " एकशे नव्वद ते दोनशे जागांवर विजय नक्कीच मिळेल." त्यावर चव्हाण साहेब उत्तरले "टीक आहे उतरलेल्या ऐंशी जागांवर पराभव होईल असे वाटते त्या जागेत बारामती धरा आणि शरदला उमेदवारी द्या." पवारांची उमेदवारी पक्की झाली पण त्यानं विरोध चालूच होता पुढे यशवंतरावांनी बारामतीमध्ये सभा घेतली व पवार साहेब निवडून देखील आले. ह्यावरून शरद पवार आणि यशवंतराव चव्हान यांचे जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित होतात. पुढे पवार साहेब मुख्यमंत्री झाले केंद्रात मंत्री झाले. 1960 ला स्वतःच्या भावाला पराभूत करून केलेली राजकारणाची सर्वात अविरत सुरूच आहे तसेच त्यांच्या बंधूंनी देखील याबद्दल राग कधी मनात धरला
नाही.
0 टिप्पण्या