" कोल्हापूरच्या राज्याचे तुम्ही मालक आहात, हे प्रत्येकाच्या ध्यानी प्रथमपासून आणून द्या आणि तुमचा चागुळपणाचा फायदा तुमच्या नोकरशाहीला उठवून देऊ नका." हा सल्ला त्यांना त्यांच्या गुरूंनी दिला होता त्याप्रमाणे वागून त्यांनी हळूहळू पण आत्मविश्वासाने राज्य चालवले.
महाराजांचे शिकारीविषयी प्रेम :
शिकार हा राजे-रजवाड्यांचा फार पुरातन काळापासून आवडता छंद मानला जातो. कोल्हापूर छत्रपती घराण्यातही पूर्वीपासून शिकारीचा छंद होताच; पण मधल्या काळात अल्पवयीन छत्रपती गादीवर आल्याने काहीसा लुप्त झाला होता. शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात या कलेचे पुनरुज्जीवन केले आणि उत्तकर्षास नेली. त्यांना चित्ता, ससाणा व रानडुक्कर यांची शिकार फार आवडत होती. चित्ता शिकार ही त्यांची खासियत होती. ते बंदूक वापर किंवा शॉटगन वापरात पटाईत होते.चित्त्याच्या शिकारीचे तंत्र शाहू महाराजांनी कोल्हापूरला आणले आणि ते इतके विकसित केले की, पूर्ण भारतात कोल्हापूर संस्थान 'चित्ता शिकारी'साठी प्रसिद्ध पावले. खुद्द महाराजांच्या बाबतीत बोलायचे झाले तर सर्व शिकार प्रकारांत 'चित्ता शिकार' हा त्यांचा सर्वांत आवडीचा छंद होता. महाराजांनी अनेक चित्ते बाळगून त्यांना प्रशिक्षित केले होते. महाराजांनी चित्ता शिकारीसाठी संस्थानात अनेक ठिकाणी संरक्षित वने तयार केली होती. तेथे असणाऱ्या काळवीटांचे शिकार करण्याचे प्रशिक्षण चित्त्याला दिलेले असे.
शिकारीला जाताना महाराज चित्ता वाहून नेणारी घोडागाडी स्वतः हाकीत असत. दिल्लीला शिकारीला जात असताना महाराज आपले चित्ते सोबत शिकारीला नेत असत. चित्त्यांना दूरवर वाहून नेणाऱ्या अशा गाड्या त्यांनी स्वतःच डिझाइन करून, बनवून घेतल्या होत्या. संस्थानाला जेव्हा व्हॉइसरॉय, गव्हर्नर यांसारखे बडे पाहुणे भेट देत, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ चित्ता शिकार आयोजित केली जात असे. शिकारीला जात असताना चित्ता वाहून नेण्यासाठी जी घोडागाडी असायची ती महाराज चालवत असत. दिल्लीसारख्या दूरच्या ठिकाणीही शिकारीसाठी ते आपल्यासोबत चित्ते नेत असत. चित्त्यांना दूरवर वाहून नेणाऱ्या अशा गाड्या त्यांनी स्वतःच डिझाइन करून, बनवून घेतल्या होत्या. संस्थानाला जेव्हा व्हॉइसरॉय, गव्हर्नर यांसारखे बडे पाहुणे भेट देत, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ चित्ता शिकार आयोजित केली जात असे.
- हे पण वाच ना भाऊ
- तो आयुक्त ज्यांना प्रधानमंत्री देखील भीत असत !
- शरद पवारांनी स्वतःच्या भावाला हरवून राजकारणाची सुरवात केली होती.
- पगार पुरत नव्हता म्हणून शास्त्रीजी वर्तमापत्रात लिखाण करत असत
- मिझोराम राज्याने स्वतःला आझाद देश म्हणून घोषीत केले.
- महात्मा फुले हे टाटांपेक्षा श्रीमंत होते....
आणखीन एक धोकादायक आणि मर्दानी खेळ म्हणजे 'रानडुक्कराची शिकार'. चित्त्याच्या शिकारी इथकीची रानडुक्कराची शिकार महाराजांना आवडत असे. शिकाऱ्याला घौडदौडीचे कौशल्य, धाडस, चापल्य, प्रसंगावधान आणि शारीरिक दणकटपणा आणि भाल्याची नेमबाजी करून डुकराचा पाठलाग करणे आवश्यक आहे. डुकराचा पाठलाग करताना घोडा थोडासा अडखळला किंवा डुकराला भाला लावताना नेम चुकला तर मृत्यूशीच सामना होतो. खुद्द महाराजांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी अशाच एका डुकराच्या शिकारीमध्ये घोड्याने दगा दिल्यामुळे मृत्युमुखी पडले होते.त्यावेळी, भारतातील अनेक लोकांना वाघ आणि अस्वल यांसारख्या वन्य प्राण्यांची शिकार करायला आवडत असे. त्यांची शिकार करण्यासाठी खूप शौर्य, कौशल्य आणि अचूक नेमबाजी करावी लागली. महाराज खरोखर शिकार करण्यात चांगले होते आणि त्यांच्याकडे हे सर्व गुण होते. महाराजांनी अस्वलाची तसेच वाघांची देखील शिकार केली होती. जेव्हा ते 22 वर्षांचे होते तेव्हा त्याने पावणे नऊ फूट लांबीच्या एका ढाण्या वाघाची मोठ्या धाडसाने शिकार केली. ह्या शिकारीत त्यांच्या जीवावर बेतले होते; पण प्रसंगावधानमुळे ते बचावले. असेच धाडस व प्रसंगावधान राधानगरीच्या जंगलात खवळलेली जंगी अस्वलीण अंगावर चालून आली असताना त्यांनी दाखविले होते. या वेळी तर त्यांनी अस्वलिणीशीच झटापट केली होती. आणखी एका प्रसंगी पन्हाळ्याच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या 'तेंडवा' जातीच्या क्रूर वाघावर महाराज निःशस्त्र चालून गेले आणि पटक्याने गुंडाळलेला आपला एक हात त्या वाघाच्या जबड्यात घालून, तर दुसऱ्या हाताने महाराजांनी वागाचे नरडे अवळले आणि आपल्या ताकतीच्या जोरावर वाघाला मारले होते. ही गोष्ट शिकारीच्या इतिहासात विलक्षणच मानावी लागेल.
शिवाय बहिरी ससाणा शिकार-तंत्र शाहू महाराजांनी विकसित केले होते. या ससाण्याकडून ते अतिशय वेगवान असणाऱ्या काळविटांची आणि माळढोकांची शिकार करत असत. शिकारचे अनेक प्रकार विकसित करणाऱ्या शाहू महाराजांना वन्यजीवनाविषयी विलक्षण आस्था होती, तसेच आपल्या संस्थानातील वन्यपशुंचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या बाबतीत ते अत्यंत दक्ष होते. कोल्हापूरच्या आसमंतात पूर्व बाजूस त्यांनी हरणे, रानडुकरे, ससे, रानकोंबडे या प्राण्यांसाठी अनेक संरक्षित वने तयार केली होती; तर पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटात अनेक जंगले अभयारण्ये म्हणून राखून ठेवली होती. या अरण्यात वाघ, बिबळे, गवे, सांबरे, अस्वले, रानडुकरे इत्यादी अनेक प्राणी आणि विविध प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी सुखनैव संचार करीत असत. या अरण्यात महाराजांनी रानहत्तीही आणून सोडले होते.
शाहू महाराजांनी आपल्या राजधानीत बाळगलेले हत्ती, घोडे, उंट, चित्ते हे प्राणी कोल्हापूर राजधानीची शोभा वाढवीत होते. विशेषतः हत्ती आणि घोडे यांच्यावर विलक्षण प्रेम करणारा हा राजा होता. मस्तीत आलेल्या हत्तीला काबूत आणण्यासाठी महाराजांनी प्रसंगी आपले प्राणही धोक्यात घातल्याच्या कथा त्यांच्या चरित्रात आहेत. मदमस्त झालेल्या हत्तीची साठमारी हा खेळ त्यांनीच बडोद्याहून कोल्हापूरला आणला आणि आपल्या कल्पनेप्रमाणे विकसित केला. तथापि, महाराजांनी बडोद्याच्या साठमारीहून 'कोल्हापूरची साठमारी' अधिक धोक्याची अर्थात अधिक रोमांचकारी बनवली. साठमारीचे आगड (आखाडे) त्यांनी आपल्या कल्पनेनुसार बांधले. बडोद्याची साठमारी घोड्यावर स्वार होऊन खेळली जाई. शाहू महाराजांचे साठमार पायीच हत्तींवर चाल करीत आणि हत्ती चवताळून चालून आला की, आगडात मध्यावर बांधलेल्या बुरुजात आश्रय घेत. या वेळी साठमाराच्या प्रसंगावधान व चपळाई या गुणांची कसोटी लागत असे.
शाहू महाराजांचे 'चित्ता' या प्राण्यावर भारी प्रेम होते. चित्ता हा प्राणी अतिशय क्रूर समजला जातो; पण अशा प्राण्यावर प्रेम केले तर तोही आपला मूळचा धर्म सोडून मालकावर प्रेम करतो, असे त्यांना वाटे. महाराजांनी आफ्रिकेतील अत्यंत क्रूर चित्ता पाळला होता. त्याला त्यांनी प्रेम केले होते की, तो आपणास कधीच दगा- फटका करणार नाही, असे त्यांना वाटे. एकदा त्यांनी या चित्त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याचे डोळे बंद करून कोल्हापूरपासून अनेक कोस दूर अंतरावर जंगलात त्याला सोडून दिले. आश्चर्य असे की, तो चित्ता आपल्या मालकाचा शोध घेत घेत पुन्हा महाराजांसमोर दत्त म्हणून हजर झाला! . महाराजांच्या दिवाणखान्यात त्यांच्या सभोवती दोन चित्ते पाळलेल्या कुत्र्यासारखे फिरत असत. दरबारी हुजरेंपेक्षा ते प्राण्यांमध्ये जास्त रमत असतं.
Source : समाजक्रांतीकारक राजश्री शाहू महाराज - जयसिंगराव पवार.
0 टिप्पण्या