Looking For Anything Specific?

Header Ads

या चार शब्दांमुळे आर. आर. पाटलांची आमदारकी वाचली !!!

 महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्व अशी आहेत किंवा होती जी आपल्या साधेपणामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे लोकांच्या मनावर छाप सोडतात. अशाच एका नेत्याचं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, आर. आर. पाटील ज्यांना आपण आबा म्हणून ओळखतो. आर. आर. पाटील यांचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. ते नेहमी साध्या कपड्यांमध्ये, कोणताही तामझाम न करता फिरत असत. त्यांच्या कार्यशैलीतून जनतेशी असलेल्या घट्ट नात्याचा प्रत्यय येतो. जेव्हा ते गावी असत तेव्हा ते शेतामध्येही काम करत असत लक्ष देत असत आणि यामुळे त्यांचं पाय जमिनीवर राहिलं. त्यांची मुले देखील सध्या जिल्हा परिषदेतील शाळेत शिकले होती. 


चार शब्दांमुळे आर. आर. पाटलांची आमदारकी वाचली !!!

कारकिर्दीची सुरवात :


आर आर आबांचा जन्म सांगली जिल्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात 16 ऑगस्ट 1957 रोजी झाला. त्यांची आर्थिक स्थिती जेमतेम होती. त्यातून त्यांनी प्राथमिक शिक्षण तासगाव तालुक्यात घेऊन पुढील शिक्षण घेण्यासाठी सांगलीला गेले. त्यांनी माजी आमदार पी.बी. पाटील यांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतन येथे 'कमवा व शिका' या योजनेतून पूर्ण केले. आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. ते एक चांगले वक्ते होते, त्यांना वक्तृत्व स्पर्धेतून जी रक्कम मिळत असे ते शिक्षणासाठी वापरात असे. त्यांनी जिकरीने आपले एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 


पुढे सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक लागली होती, आबांनी संपंतराव माने यांच्याकडे जिल्हा परिषदेचे तिकीट मागितले आणि ते त्यांना मिळाले देखील आणि ते सावळज मधून निवडून आले. त्यांनी तब्बल 11 वर्ष जिल्हा परिषद गाजवली. 1990 मध्ये त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले व ते काँग्रेसचे आमदार झाले, येथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 1990 ते 2014 ते अपराजित राहिले. 


हे पण वाच ना भाऊ :


राजश्री शाहू महाराजांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी ढाण्या वाघ मारलेला !!

महात्मा फुले हे टाटांपेक्षा श्रीमंत होते.....  

शरद पवारांनी स्वतःच्या भावाला हरवून राजकारणाची सुरवात केली होती.

पगार पुरत नव्हता म्हणून शास्त्रीजी वर्तमापत्रात लिखाण करत असत.


आमदारकी वाचली : 


1995 साली राज्यात युतीचे सरकार होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्याकाळी युती शासनावर कोणतेही आरोप नव्हते. आर.आर.आबाही त्या काळी तरुण आमदार होते व त्यांचे वक्तृत्व सुंदर असल्याने त्यांची भाषणे देखील जोरदार होत असतं. ते आपल्या भाषणाने सभागृह हलवून सोडत. एके दिवशी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू होते, आबांचे भाषण देखील जोरदार सुरू होते, ते सुरू असताना त्यांनी सहारा प्रकरणात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर 100 कोटीचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप केले. आबांचे हे भाषण शरद पवार साहेबांनी त्यांच्या केबिन मधून एकले होते, त्यांनी चिट्टी पाटवून आबांना त्वरित बोलवून घेतले. आबा शरद पवारांकडे गेले पवारांनी त्यांना पुरावे मागितले, तेंव्हा आबा म्हणाले 'पुरावे नाहीत, आणि सभागृहात बोलल्याने अब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल करता येत नाही.' त्यावर शरद पवार साहेबांनी समजावून सांगितले की हक्कभंग येऊ शकतो आणि आमदारकी जाऊ शकते. आता मात्र आबा घाबरले होते, त्यावर पवार साहेबांनी सांगितले की तुमच्या भाषणाची प्रत येईल त्यावर सही करण्यापूर्वी प्रत्येक आरोपापुढे " अश्या बाहेर चर्चा आहेत " असे लिहायला सांगितले व आबांनी तसे लिहिले . इकडे युती शासन देखील आर. आर. आबांवर हक्कभंगाची तयारी करत होते. मनोहर जोशी यांनी सचिवांना सांगून देखील ठेवले होते, पण त्यांनी आबांच्या भाषणाची प्रत पाहिले व " अश्या बाहेर चर्चा आहेत " या चार शब्दांनी आबांनी आमदारकी वाचली.


1999 साली आर.आर.पाटील शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्या साली आघाडीचे सरकार आले व आबांना ग्रामविकास मंत्रिपद मिळाले. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी या पदाची शोभा वाढवली. त्यांनी तंटामुक्ती गाव अभियान सुरू करून गाव-गाड्यातील भांडणे मिटवली तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू करून ते प्रसिद्ध केले. 2004 मध्ये ते राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमत्री झाले. ह्या काळातील त्यांचा डान्स बार बंदचा निर्णय घेऊन खूप संसार वाचवले. अनेक दबाव येऊन देखील त्यांनी हा निर्णय बदलला नाही.26/11 च्या हल्ल्यावेली त्यांना गृहमंत्री पद सोडावे लागले होते. 2009 मध्ये ते परत गृहमंत्री झाले. त्याचा काळात 5 वर्षात 65000 पोलिस भरती झाली होती. ह्या वेळी त्यांना एका अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्लाचे पालकमंत्रिपद स्वीकारण्याचे चॅलेंज केले ते आबांनी स्वीकारले. गडचिरोलीला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुद्धा पालकमंत्री जात नसतं. 12 जानेवारी 2010 रोजी आबांनी गडचिरोली पालकमंत्री म्हणून दौरा केला. तो दौरा त्यांनी चक्क मोटारसायकलने केला. ज्या जिल्ल्यात नेते ध्वारोहणासाठी देखील जात नव्हते तेव्हा आबांनी मोटासायकलवरून दौरा केला होता. ते प्रत्येक महिन्यातील दोन दिवस गडचिरोलीसाठी राखीव ठेवले होते. त्यांच्या काळात ह्या जिल्हाला 850 कोटींचा निधी दिला होता. तसेच त्याचा काळात सगळ्यात जास्त नक्षलवादीनी आत्मसमर्पण केले होते. 


बाकीचे नेते मंत्रिपद मिळाल्याने प्रकाशझोतात येतात पण आबांबाबत हे उलट असायचे आबांमुळे ती मंत्रालये लोकांपर्यंत पोचली. उदाहरण द्यायचे म्हंटले तर ग्रामविकास मंत्रालय, त्यांच्या कामाने ते प्रत्येक पडला न्याय देत असत. साधेपणा, प्रामाणिकता आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात नेहमीच विशेष स्थान आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या